श्री आई तुळजाभवानी

क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती अर्थात अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी अर्थात आई तुळजाभवानी देवी!! श्री स्कंद पुराणात आई भगवतीच्या अवतारकार्याची महती आढळते. एक महान तपस्वी असणारे कर्दम ऋषी यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाण्यास निघाली होती. परंतु, तिच्या गुरूने तिला सती न जाण्यास विनंती केली. तेंव्हा आपल्या पुत्रास आपल्या गुरुच्या स्वाधीन करून ती तपश्चर्या करण्यास बसली. अनुभूती ध्यानस्थ बसलेली पाहून कुकर नामक राक्षसाने तिची तपश्चर्या भंग करून तिचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र तिला त्याची अत्यंत भीती वाटली. ती घाबरून पळत सुटली; कुकर राक्षस देखील तिच्या मागे धावत सुटला. मात्र, कुकर राक्षसापासून वाचण्यासाठी जरी ती धावत असली तरी मनात आई भगवतीचा धाव ती करीत होती. अनुभूतीने आपले पावित्र्य रक्षण करण्यासाठी भगवती मातेचा मनापासून केलेला धावा पाहून आई भगवती अनुभूतीच्या रक्षणासाठी धावूनआली. तिने त्या राक्षसा सोबत युद्ध केले व त्याचा वध केला. आई भगवती आपल्या हाकेला त्वरित धावून आली याचा आनंद तेव्हा अनुभुतीला झाला.

पुढे वाचा

श्री तुळजाभवानी सेवा संस्था

आई तुळजाभवानी देवीचे ठाण्याच्या गणेशवाडी -पांचपाखाडी येथे असलेल्या मंदिराचे व्यवस्थापन हे श्री तुळजाभवानी सेवा संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येते. सकाळी अलंकार अभिषेकी पूजा, दुपारी महानैवैध्य, सायंआरती , शेजारती असा दैनंदीं कार्यक्रम या मंदिरात असला तरी नवरात्र उत्सवात मंदिरात अभूतपूर्व भक्तिभाव ओसंडून वहात असतो. घटस्थापना ते विजयादशमी या काळात धार्मिक विधींची रेलचेल असते.

पुढे वाचा

देवी तुळजाभवानी: फोटो आणि व्हिडिओ संग्रह

पुढे पहा